Get Mystery Box with random crypto!

छत्रपती शिवाजी महाराज व आपले जीवनध्येय…..! थोर महात्मे होऊन | The Infinity Academy

छत्रपती शिवाजी महाराज व आपले जीवनध्येय…..!

थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा |
आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा…!!

Instagram : https://bit.ly/44nDUwc

नमस्कार विद्यार्थी मित्रहो….
बाल शिवाजीच्या मनात जिजाऊमातेने स्वराज्याची कल्पना जागवली. परंतु सगळ्या परिस्थिती प्रतिकूल असताना, सगळे मराठा सरदार एकमेकांमध्ये भांडत असताना, टोपीकर इंग्रज, आदिलशाह, पोर्तुगीज , जंजी-याचा सिद्धी जौहर आणि जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे मुघल एवढे सर्व शत्रू आजूबाजूला असताना छत्रपतींनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी या मराठा सरदाराच्या पोरांनं/ जाहागीरदाराच्या मुलाने रानवाटा तुडवल्या, डोंगरदऱ्या पार केल्या व बारा मावळांमध्ये फिरून वयाने लहान परंतु मोठे स्वप्न असणारे आपले सवंगडी तयार केले. अवघ्या वयाच्या 16 व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.

या स्वराज्याला नाव दिले हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य म्हणजे सिंधूच्या उगमापासून कावेरीचा तटापर्यंत किंवा पेशावर पासून तंजावर पर्यंत ही महाराजांच्या मनातील स्पष्ट कल्पना होती. हे स्वप्न साकारण्यासाठी महाराजांनी दुर्दम्य इच्छाशक्ती, उत्तम नियोजन, परफेक्ट कार्यवाही अद्वितीय पराक्रम केला व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

मित्रहो….
आपल्यालाही घरची परिस्थिती, आजूबाजूची स्पर्धा, मनाची स्थिती, आर्थिक बाबी अश्या वेगवेगळ्या समस्या असू शकतील; परंतु आपणाला सर्वोत्तम ध्येयाचा ध्यास असेल तर तेच आपल्याला स्फूर्ती देत असते, आपल्याला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी नियती ही आपली साथ देते; हाच शिवाजी महाराजांचा आदर्श आणि हीच शिवाजी महाराजांची शिकवण….!

Join Instagram : https://bit.ly/44nDUwc