🔥 Brûlez les graisses rapidement. Découvrez comment ! 💪

हवाई दलाच्या विमानांसाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’. राजस्था | The Infinity Academy

हवाई दलाच्या विमानांसाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’.

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९२५ वरील सट्टा- गंधव खंडावर भारतीय हवाई दलाच्या विमानांना आपत्कालीन परिस्थितीत उतरण्यासाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’ चे उद्घाटन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले.

या दोन मंत्र्यांसह संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत यांना घेऊन भारतीय हवाई दलाचे हक्र्युलस सी-१३० जे विमानाने या राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केले. यामुळे एनएच-९२५ हा हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी वापरला जाणारा पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरला आहे.

एनएच-९२५च्या ‘इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी’ (ईएएफ) वर अनेक विमानांच्या संचलनाचे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी निरीक्षण केले. सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाने या ठिकाणी प्रतिरूप आपत्कालीन लँडिंग केले. हवाई दल प्रमुख आर.के. भदौरिया हेही यावेळी उपस्थित होते.

एएन-३१ हे लष्करी वाहतूक विमान आणि हवाई दलाचे एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टरही ईएलएफवर उतरले.

बाडमेरप्रमाणेच एकूण २० आपत्कालीन लँडिंग धावपट्ट्या सध्या देशभरात विकसित करण्यात येत आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या मदतीने अनेक हेलिपॅडही उभारले जात आहेत. आपल्या सुरक्षाविषयक पायाभूत सोयी बळकट करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले.